नीती ही मानवनिर्मितच
“इतिहासाचे सर्व विद्यार्थी राजवाडे या अनुभवी संशोधकाला ओळखतातच. काही जणांना वाटते की अस्तित्वात असलेली सर्व नीतीची तत्त्वे अनादि अनंत आकाशातून उतरलेली आहेत आणि येणाऱ्या अनंत काळातही तशीच राहतील. त्यांना ही नीतीची तत्त्वे मोडणे ही गुन्हेगारी क्रिया वाटते. अशा लोकांना (राजवाड्यांचे लिखाण वाचून) जाणवेल की नीतीसुद्धा मानवी सर्जनशीलतेतून व उत्क्रांतीच्या इच्छेतून उपजलेली एक ‘वस्तू’ आहे, एखाद्या …